
13 जुलैला ज्येष्ठ नागरिकांचा भव्य " आषाढी लक्षवेधी मागणी महामोर्चा व उघडा डोळे पहा निट ठिय्या अंदोलन!*"
*...डाॅ.हंसराज वैद्य...*
*नांदेड:):-*
*महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठ नागरि कांच्या न्याय मागण्याकडे आजूनही सहानभूतिने पाहिले नाही!*
*महाराष्ट्र शासनाने किमान या चालू पावसाळी अधिवेशनात तरी ज्येष्ठ नागरिकांच्या न्याय तथा प्रलंबित मागण्या मानधनासह मान्य करून न्याय ध्यावा म्हणून आषाढीच्या पार्श्वभूमिवर उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फेस्काॅम नांदेडच्या वतीने शासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्या साठी एक भव्य असा "आषाढी लक्षवेधी मागणी महा मोर्चा व उघडा डोळे, पहा निट ठिय्या अंदोलनाचे " आयोजन दि.13 जुलै,रविवारी करण्यात आले आहे!*
.
*हा लक्षवेधी महा मोर्चा अध्यक्ष डाॅ.हंसराज वैद्य यांच्या नेतृत्वाखाली तर सचिव प्रभाकर कुंटूरकर,गीरिष बार्हाळे,रामचंद्र कोटलवार,लम्क्षी पुरणशेट्टीवार, डाॅ.अंजली चौधरी, डाॅ.पुष्पा कोकीळ,श्रीमती खान, डाॅ. क्राप्रतवार, ज्येष्ठ पत्रकार माधवराव पवार काटकळंबेकर, विधिज्ञ एम.झड. सिद्दिकी आदिंच्या मार्गदर्शना खाली अत्यंत शिस्तीत निघणार आहे.*
.
*मोर्चा वजिराबाद चौकातून ठिक 11 वाजता निघेल.जवळ जवळ 7500 ते 10,000 गरिब गरजवंत ज्येष्ठ नागरिक मोर्चात सहभागी असतील.मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालया समोर विसावेल. उ.म.प्रा.वि.फेस्काॅम नांदेडचे मोजके चारच कार्य कारणी सदस्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सादर करतील. जिल्हाधिकारी कार्यालया समोर लोकमत दैनिकाचे राज्य शासन पुरस्कार विजेते धडाडीचे पत्रकार "मा.श्री.सचिन मोहिते" यांचा ज्येष्ठ नागरिकांच्या वतिने जाहीर सत्कार व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी "उघडा डोळे,पहा निट!" ठिय्या अंदोलन होईल. अध्यक्ष डाॅ.हंसराज वैद्य हे गरिब,गरजवंत ज्येष्ठ नागरिकांना मार्ग दर्शन करतील.अभार प्रदर्शन व सांगता होईल.*
.