आषाढी एकादशी निमित्त मिरवणुकीचा सोहळा संपन्न
देगलूरः आषाढी एकादशी निमित्त श्री गजानन महाराज मंदिर व श्री दत्त मंदिर संस्थान बापू मार्केट देगलूर यांच्यावतीने यावर्षी प्रथमच श्री विठ्ठल रखुमाई यांच्या मूर्तींचे व श्री गजानन महाराज यांच्या मूर्ती ची पालखी मिरवणूक मंदिरापासून शहराच्या प्रमुख मार्गावरून भवानी चौक, हनुमान चौक, देशपांडे गल्ली,होट्टलवेस, सदानंद लाॅज ते लोहिया मैदान व परत मंदिर पर्यंत सकाळी ११-०० वाजता काढण्यात आली होती. या मिरवणुकीत हजारो महिला व पुरुष भाविकांनी व लहान मुले व मुलींनी उत्साह व भक्तीमय वातावरणात सहभाग घेतला होता.काही शाळकरी मुलांनी वारकरी च्या वेशभूषेत टाळ व मृदंगाच्या तालावर श्री विठ्ठल नामाचा गजर केला. महिलांनी उत्स्फूर्तपणे विठ्ठल नामाचा जयघोष करत फुगडी खेळत आनंद व्यक्त केला.मिरवणूक मार्गावर अनेक ठिकाणी रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती.काही ठिकाणी भाविकांनी विठ्ठल भक्तांसाठी केळी व फराळ पाण्याची व्यवस्था केली होती. मिरवणूक मंदिराकडे परत आल्यावर श्रीं ची आरती व सर्वांना महाप्रसादाचे वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली . त्या प्रसंगी मोठया संखेने नागरिक उपस्थित होते