logo

नांदेड - किनवट / मांडवी - सरस विद्यालयच्या वतीने मतदार जनजागरण फेरीचे आयोजन.

सरस विद्यालयाच्या वतीने मतदार जनजागरण फेरीचे आयोजन.

मांडवी : इंदिराबाई राठोड ट्रस्ट द्वारा संचलित, सरस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि सरस विद्यालय (इंग्रजी माध्यम), मांडवी,ता.किनवट, जि.नांदेड. येथे आज दिनांक २५/१०/२०२४, शुक्रवार रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ निमित्त, मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशान्वये, मतदार जनजागृतीपर फेरी काढली.
दोन्ही माध्यमाच्या जवळपास सातसे वीस विद्यार्थ्यांनी यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध प्रकारच्या जनजागरणपर घोषवाक्यांनी अवघी मांडवी नगरी दुमदुमली.
१} प्रजासत्ताक लोकशाहीचे समाधान, चला करूया मतदान, २} दानात दान, मतदान,
३} मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो,
४} कर जिम्मेदारी पुरी, मतदान बडा जरूरी.
५} मतदानाची कास धरू, लोकशाही मजबूत करू,
६} विश्वाचे मूलमंत्र, भारताचे गणतंत्र.
इत्यादी जयघोषाने परिसर निनादू लागले. विद्यार्थी शिक्षकांचा पहाडी आवाज संपूर्ण मांडवी शहरात घुमू लागला. शिक्षक विजय जाधव, रमेश पडगिलवार, कुणाल राठोड, संतोष कांबळे यांनी ध्वनिक्षेपकांवर नारे दिले आणि गणेश राठोड व विष्णुदेव जाधव यांनी बँड पथकाची धुरा सांभाळली. संपूर्ण जनजागरणपर रॅलीचे छायाचित्रण शिक्षक सतीश खडसे यांनी केले.
याप्रसंगी पळशी जिल्हा परिषद संकुलाचे केंद्र प्रमुख तथा केंद्रीय मुख्याध्यापक दत्तात्रय संदुलवार यांनीही आपला अमुल्य सहभाग नोंदवून विद्यार्थांचा आनंद द्विगुणित केला.
मतदार फेरी झाल्यानंतर शाळेत येऊन संपूर्ण विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी डाॅ.वसंत राठोड लिखित, मतदानाविषयीची सामुहिक " मतदार प्रतिज्ञा " घेतली. यानंतर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी, " लाडका मतदार " हे बहारदार पथनाट्य सादर करून सर्वांची मने जिंकली. यावेळेस सर्वच विद्यार्थ्यांचा उत्साह पाहताक्षणी दिसत होता. या संपूर्ण भरगच्च जनजागरणपर रॅलीचे समारोप शाळेच्या भव्य प्रांगणात करण्यात आले. दोन्ही माध्यमाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी हिरिरीने सहभाग घेतला. याकामी सर्वच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारीवर्गांनी परिश्रमपूर्वक योगदान दिले.

102
2754 views