रामसृष्टी तपोवन पंचवटी नाशिक येथे संत, महंत, स्थानिक रहिवासी यांच्या उपस्थितीत "श्रीराम कपिला गोदावरी नदी संगम आरती समिती स्थापना"
रामसृष्टी तपोवन पंचवटी नाशिक येथे संत, महंत, स्थानिक रहिवासी यांच्या उपस्थितीत "श्रीराम कपिला गोदावरी नदी संगम आरती समिती स्थापना"
तपोवन येथे मा.आमदार यांच्या प्रयत्नातुन उभारण्यात आलेल्या भव्य श्रीरामाच्या मुर्तीचे पावित्र्य राहावे व त्याच बरोबर कपिला व गोदावरी नदीचे महत्त्व अबाधित राहून परिसरात स्वच्छता राहावी यासाठी प्रतिदिन प्रभू श्रीराम व कपिला गोदावरी नदीची आरती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या आरतीमुळे त्यामुळे स्थानिक रोजगार वाढेल रोज उद्यान म्हणून वावरत असलेले युवा वर्ग व गैरप्रकार यालाही आळा बसण्यास मदत होईल, पोलीस प्रशासन व महानगर पालिका प्रशासनास यामुळे सहकार्य होईल या उद्देशाने व संत हे समाजाला त्यांच्या वाणी तून व आचरणातून चांगले जगण्याचा मार्ग दाखवतात, शासनाने घालून दिलेले नियम अटी व त्याचे पालन करून घेवू शहर विकासाला गतिमान करणारे प्रशासन अर्थात संत, शासन व समाज यांचा समन्वय करण्या करिता मागील कुंभमेळ्याचे मुख्य समन्वयक महंत डॉ भक्तीचरण दास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले.
युनेस्को या जागतिक महोत्सव यादीत नोंद झालेल्या मागील कुंभमेळ्याचे यशस्वी समन्वयक महंत डॉ भक्तीचरण दासजी महाराज यांनी पुढाकार घेवून सर्व संत,महंत यांना एकत्र एकाच व्यासपीठावर आणत ऐतिहासिक क्षणाचे आपण सर्व साक्षीदार होत असल्याचे सांगत हे कार्य आम्ही सतत चालू ठेवणार असल्याचे आश्वासन देवून सर्वांना संघटित समर्पित कार्य करण्याचे आवाहन केले. गोदावरी नदी किनारी त्रंबकेश्वर ते राजमहेंद्री आंध्र प्रदेश पर्यंत कितीही आरती केल्या जाऊ शकतात कोणतीही मर्यादा नाही कपिला गोदावरी संगम आरतीमुळे भाविकामध्ये चैतन्य व उत्साह निर्माण होईल यामुळे चुकीच्या गोष्टीना आळा बसण्यास मदत होईल यात सर्व स्थानिकांना सहभागी करून घेतले जाईल.
वाराणशी सह इतर ठिकाणी नदी किनारी बारा आरत्या केल्या जातात. ज्या कुंभमेळ्याचे मुख्य स्थान असलेली व प्रभू श्रीरामांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या लक्ष्मणाच्या तपोभूमी तपोवनात आरती असावी सर्व साधू महंत यात सहभागी असावे तसेच तपोवनात वनवास काळात प्रभू श्रीराम यांच्या समवेत माता सीता व लक्ष्मण ही होते त्यांची मूर्ती असावी अशी खंत महामंडलेश्वर रामसनेही दास महाराज यांनी व्यक्त केली.
गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करायची असेल तर स्थानिक नागरिकांचा सहभाग असावा त्यांची नदी सोबत नाळ जोडणे आवश्यक आहे असे
गेल्या बारा वर्षांपासून मा उच्च न्यायालयात गोदावरी प्रदूषण मुक्त करण्यासाठी लढणारे निशिकांत पगारे गोदावरी प्रदूषण व आपली जबाबदारी यावर मार्गदर्शन केले.
मा रामसिंग बावरी, नंदू कहार, नागेश चव्हाण यांनीही आपली मनोगते व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाच्या चला जानू या नदीला या उपक्रमाचे प्रतिनिधी कपिला नदी संवर्धन समितीचे योगेश बर्वे यांच्या माध्यमातून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी सायं 6.30 वाजता भव्य आरतीचे आयोजन केले असून त्यास परिसरातील नागरिक नाशिककरांनी सहभागी व्हावे असे आवाहन कपिला नदी संवर्धन समितीचे दीपक बैरागी यांनी केले. याबैठकीचे आभार नागेश चव्हाण यांनी मानले.
महंत रामकिशोरदास महाराज, महंत बैजनाथ महाराज, महंत राजाराम महाराज, महंत शंकरदास महाराज, महंत सीताराम दास महाराज, प्रा सोमनाथ मुठाळ, सुनिल परदेशी, वीरेंद्र टिळे, नरहरी उगलमूगले, अलकाताई अंडे, रंजनाताई कडाळे, कलावती देशपांडे, चंद्राबाई चव्हाण यांच्या सह तपोवन परिसरातील मठ ,मंदिर, आश्रम, व स्थानिक मंडळ व संस्थांचे प्रतिनिधी आखाड्यातील संत महंत उपस्थित होते...