logo

भिगवण परिसरात जोरदार पाऊस सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

भिगवण परिसरात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी 3 वाजता पावसाने हजेरी लावली. मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसला.

तक्रारवाडी येथील जिल्हा परिषद शाळे समोर पाणी साचुन ते पाणी शाळेतील वर्ग खोल्यात शिरले त्यामुळे वर्गातील मुलांचे हाल झाले लवकरात लवकर उपाय योजना करून संबंधित विभागाने या गोष्टीकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे..

तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुणे-सोलापुर रोड लगत असलेल्या गाळ्यांन समोर पाण्याचे तळे
साठले. वारंवार मागणी करून देखील सिमेंन्ट काँक्रीटीकरण करुन देण्यास टाळा टाळ होत असल्यामुळे तेथील व्यापारी वर्ग हैराण झाला आहे.

भिगवण परिसरात दुपारी 3 वाजेच्या - सुमारास पावसाला सुरुवात झाली. पाऊस एवढा जोरात होता की डोंगरावरून पडणाऱ्या पाण्याला धबधब्याचे स्वरूप आले होते. तसेच भिगवण बस स्टँड परिसर येथे देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते त्यामुळे तेथील परिसराला तलावाचे स्वरूप आले होते एसटी ची वाट पाहत थांबलेल्या नागरिकांना याचा खुप त्रास सहन करावा लागला. तसेच महाराष्ट्र बँक भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्र थोरात नगर परिसरात देखील पाणी साचले होते.

भिगवण भागांत पावसाचा चांगलाच जोर पहायला मिळाला. सायंकाळपर्यंत कधी जोरदार तर कधी मध्यम स्वरूपात पाऊस बरसत होता; पावसाचा कधी जोर वाढत होता, तर कधी रिमझिमच होती. पावसामुळे वातावरणात सर्वत्र गारवा पसरला होता. काही महिन्यांपूर्वी - उणे असलेले उजनी धरण दमदार पावसामुळे पूर्ण शमतेने भरून वाहत आहे. शेतकरी वर्गाची या वर्षीची पाण्याची चिंता मिटल्यामुळे सर्व शेतकरी वर्ग सुखावला आहे.

4
864 views