logo

कोरोना लसीकरणाचा पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते शुभारंभ


सांगली: कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.   इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय येथील आरोग्य कर्मचारी गोरखनाथ चंदणशिवे यांना सिरमची कोव्हीशिल्ड ही पहिली लस देण्यात आली.  


यावेळी खासदार धैर्यशिल माने, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, इस्लामपूर उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एम. आर. देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ. विक्रम कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. राणोजी शिंदे, डॉ. अशोक शेंडे आदी उपस्थित होते. 

प्रारंभी पालकमंत्री जयंत पाटील यांनी लसीकरणासाठी उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या वेगवेगळ्या विभागांची पाहणी केली. तसेच सिरमची कोव्हीशिल्ड या लसीची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय सांळुखे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे यांच्याकडून जाणून घेतली. ज्या आरोग्य विभागीतील डॉक्टर व कर्मचारी यांना लस देण्यात येणार होती यांच्याशी संवाद साधला.  

कोरोनाची प्रथम लस घेणारे गोरखनाथ चंदणशिवे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, कोरोनाची कोव्हिशिल्ड ही लस पुर्णपणे सुरक्षीत असून गेल्या एक तासापासून मला कोणताही त्रास जाणवला नाही. कोरोना लस घेऊन कोरोना मुक्त व्हावे. आपण सुरक्षित तर आपला देश सुरक्षित असे ते म्हणाले. 

कोरोना लस घेणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ पल्लवी जाधव म्हणाल्या, कोरोनाचा समुळ नाश करण्यासाठी कोरोना लस घेणे आवश्यक आहे. मी ही लस घेतली असून या लसीचे कुठलेही दुष्परिणाम नाहीत. ही लस पुर्णपणे सुरक्षित आहे.

126
14687 views
  
23 shares