logo

क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त विशेष साहित्य संमेलनाचे आयोजन , नवी मुंबई - साहित्यसम्राट अण्णाभ

क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त विशेष साहित्य संमेलनाचे आयोजन ,

नवी मुंबई - साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य व स्वराज्य समाज विकास फाउंडेशन नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 20 नोव्हेंबर 2022 रोजी शेतकरी समाज मंदिर हॉल कोपरखैरणे येथे क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त विशेष साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक लोकनेते आमदार गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक यांच्यासह संमेलना अध्यक्ष प्रा डॉ मोहन लोंढे स्वागत अध्यक्ष मा एड राजेंद्र सकट मा बाळासाहेब माने संयुक्त संयोजन समिती अध्यक्ष कोकण विभाग प्रमुख साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य मा डॉ विठ्ठल भंडारे संस्थापक अध्यक्ष मा रविंद्र पवार अण्णाभाऊ साठे पुतळा समिती चेंबूर डॉ किशोर जोगदंड कार्याध्यक्ष अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद मा राजेंद्र बोडके कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रा डॉ धनंजय बेडदे लेखक व विचारवंत लेफ्ट डॉ राज ताडेराव महासचिव साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे साहित्य संमेलन होते आहे संमेलनास बहुजन नेते बाबासाहेब गोपले साहित्यनगरी असे संबोधले आहे प्रवेशद्वारास बंडखोर लेखिका मुक्ता साळवे असे नामकरण करण्यात आले आहे व ज्या विचार मंचावर संपूर्ण साहित्य संमेलन पार पडणार आहे त्या विचार मंचास जगद विख्यात साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असं नामकरण करण्यात आलं आहे या संमेलनात कुसुमताई गोपले, अशोक लोखंडे ,भीमराव घेरडे, दशरथ रसाळ, भारती लोकरे- कांबळे,अशोक कांबळे- आळतेकर,राजू बाविस्कर, डॉ सयाजीराव गायकवाड या महाराष्ट्रातील नामवंत मान्यवरांना विविध समाजभूषण पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे त्याचबरोबर साहित्य रशिकांसाठी खास पहिल्या सत्रामध्ये क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे व मुक्ता साळवे यांचे सामाजिक व शैक्षणिक कार्य आणि मातंग समाजाची सद्यस्थिती यावरती परिसंवादाचा आयोजन करण्यात आलेला आहे यामध्ये डॉ संभाजी बिराजे,डॉ सुरेश चौथाई वाले औरंगाबाद, प्रा शिवाजीराव देवनाळे लातूर, डॉ दशरथ रसाळ सोलापूर हे मान्यवर आपले विचार मांडणार आहेत दुसऱ्या सत्रामध्ये समाज प्रबोधन चळवळीत अण्णाभाऊ साठे यांचे साहित्याचे योगदान आणि आजचे वास्तव हा परिसंवाद आयोजित केला आहे यामध्ये मा डॉ प्रेम हनवते ज्येष्ठ लेखक विचारवंत यवतमाळ, डॉ सुकुमार आवळे कोल्हापूर, डॉ सीमा मुसळे मुंबई, मा भारत दाढेल नांदेड हे मान्यवर वक्ते आपले विचार मांडणार आहेत त्याचबरोबर कविता रसिकांसाठी खास निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित केले आहे संमेलन अध्यक्ष कवी प्रा रवींद्र पाटील ज्येष्ठ कवी नवी मुंबई हे असणार आहेत यामध्ये वैभव वराडी सौ छाया बेले, जितेंद्र लाड ,किरण भिंगारदिवे, एन सी भंडारे, रुद्राक्ष पातारे दिगंबर घंटेवाड बापू पाटील ,ज्ञानेश्वर ननूरे, विवेक वारभुवन ,नारायण लांडगे, शंकर गोपाळे ,माधवी मोतलिंग, बालकवी प्रसाद माळी तसेच या कवी संमेलनाचे सूत्र संचालन कवी नारायण लांडगे व प्रा अमोलकुमार वाघमारे हे करणार आहेत यांच्यासह अनेक नामवंत कवी सहभागी होणार आहेत अशी अस्सल कवितांची मेजवानी या साहित्य संमेलनामध्ये आपणास मिळणार आहे तरी नवी मुंबई परिसरातील सर्व नागरिकांनी या साहित्य संमेलनाचा लाभ घ्यावा असे आव्हान संयुक्त संयोजन समितीच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब माने व एड राजेंद्र सकट यांनी केले संमेलन यशस्वी होण्यासाठी डॉ राज ताडेराव, प्रा अमोल वाघमारे,सुरेश देवकुळे एड.गुरु सूर्यवंशी,प्रमोद माने, भारत धोंगडे हे करत आहेत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून नवी मुंबईकरांनी हे संमेलन यशस्वी करावे.

29
14711 views
  
1 shares