logo
(Trust Registration No. 393)
अपने विचार लिखें....

नाशिक जिल्हा रग्बी असोसिएशन च्या खेळाडूंची ३६ व्या नॅशनल गेम मध्ये चमकदार कामगिरी ,

नाशिक - गुजरात येथे सुरू असलेल्या ३६ व्या नॅशनल गेम्स मध्ये महाराष्ट्र चा पुरुष व महिला रग्बी संघ उपविजेता ठरला व रौप्य पदक पटकावले. महाराष्ट्र संघात नाशिक जिल्हा रग्बी असोसिएशनचे खेळाडू उज्वला घुगे व आकांक्षा काटकडे समावेश होता. आपल्या बहारदार खेळाच्या प्रदर्शनाने महाराष्ट्र रग्बी संघाची कामगिरी उंचावन्यास महत्वाची भूमिका बजावली. नाशिक जिल्हा रग्बी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सुनील दिनकर साहेब, सचिव श्री. संजय चव्हाण, प्रशिक्षक मनोज कनोजिया , अनिल ढोकणे व सर्व सदस्यांनी खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले.

8
934 views
  
1 shares