logo
(Trust Registration No. 393)
अपने विचार लिखें....


धाराशिव (उस्मानाबाद) करांचे स्वप्न साकार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी !

-आमदार राणाजगजितसिंह पाटीलमोठ्या प्रतीक्षेनंतर आज उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी मिळाली आहे. उस्मानाबाद करांसाठी हा दिवस अतिशय आनंदाचा व अविस्मरणीय आहे.उस्मानाबाद येथील महाआरोग्य शिबीरा दरम्यान ४ मार्च २०१८ रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीशजी महाजन यांनी उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली होती, व आज राष्ट्रीय आयुर्वेविज्ञान संस्थेने मंजुरीचे पत्र दिले आहे.शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये हे महाविद्यालय सुरू होण्याच्या अशा अतिशय धूसर होत्या. सातत्याच्या पाठपुराव्यामुळे ठाकरे सरकारने याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला, मात्र आवश्यक पद भरती, उपकरणे, यंत्रसामग्री व सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी आवश्यक असणारा शिक्षक वर्ग याबाबत ठोस असे काहीच केले नाही. जून अखेर केवळ ३ प्राध्यापकांच्या नियुक्ती करण्यात आल्या होत्या, परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हा विषय प्राधान्यक्रमावर घेत आवश्यक उपकरणे, यंत्रसामग्रीची खरेदी व पदभरतीला वेग देत ४८ प्राध्यापक व १२ वरिष्ठ निवासी डॉक्टर्स च्या नियुक्त्या केल्या व यातील ५० जणांना उपस्थित करून घेतले. फेब्रुवारी २०२२ मध्ये राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेच्या समितीने पाहणी केल्यानंतर काढलेल्या त्रुटींची काहीही पूर्तता केली गेली नाही, कोणताही पत्रव्यवहार केला नाही. परिणामी २५ ऑगस्ट ला राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेने महाविद्यालयाला मान्यता नाकारली व या विषयावर यावर्षी कोणताही पत्रव्यवहार न करण्याचे सांगितले.मात्र कोणत्याही परिस्थितीत उस्मानाबाद येथे याच वर्षी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा संकल्प केला होता. त्यामुळे तात्काळ राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीशजी महाजन, वैद्यकीय विभागाचे प्रधान सचिव तसेच आयुक्त यांची भेट घेऊन चर्चा केली व राष्ट्रीय आयुर्विज्ञान संस्थेकडे फेर प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्रुटींच्या पूर्ततेसाठी वेगाने कामे केली, खुद्द आयुक्तांनी सुट्टीच्या दिवशी महाविद्यालयाच्या अधिष्ठातांसोबत बसून परिपूर्ण प्रस्ताव बनवला व दिनांक ५ सप्टेंबर रोजी संस्थेच्या दिल्ली कार्यालयात फेर प्रस्ताव दाखल केला. या अनुषंगाने दिनांक १८ सप्टेंबर रोजी फेर तपासणीसाठी समिती आली व त्यांनी त्रुटींच्या पूर्ततेबाबत केलेल्या कार्यवाही वर समाधान व्यक्त करत आज झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये टीम उस्मानाबादचे अभिनंदन करत वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिल्याचे पत्र दिले. उस्मानाबाद करांचे अनेक दिवसाचे स्वप्न आज साकार झाल्याचा आनंद अवर्णनीय आहे. जिल्ह्यातील जनतेचे हार्दिक अभिनंदन.याकामी केंद्रीय नेतृत्वाचे अनमोल सहकार्य लाभले, त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय आरोग्य मंत्री, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री, विविध लोकप्रतिनिधी यांच्यासह वैद्यकीय शिक्षण विभाग विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, उस्मानाबाद येथील महाविद्यालयांमधील कार्यरत अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी या सर्वांचे बहुमोल सहकार्य लाभले. याबद्दल या सर्वांचे मनःपूर्वक आभार !0
0 views