logo

*‘समृद्ध जीवन’च्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे आक्रमक* उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत

*‘समृद्ध जीवन’च्या ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे आक्रमक*

उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन

उस्मानाबाद -
समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टिपर्पज कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांना रक्कम परत मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष शाहुराज माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज (दि.14) पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात समृद्ध जीवन कंपनीकडे ठेवी अडकलेले गुंतवणूकदार महिला, पुरूष मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

समद्ध जीवन कंपनीकडे असलेली जमाराशी प्रतिबंध कायद्याप्रमाणे प्रत्येक पोलीस ठाण्यात गुंतवणूकदाराला तक्रारी दाखल करुन घेण्यासाठी पोलीस अधिकार्‍यांना भाग पाडावे, गुंतवणूकदारांच्या खात्यावर शिल्लक असलेली रक्कम व कंपनीच्या इतर बँकांमध्ये करण्यात आलेल्या ठेवीवरील निर्बंध हटवून ती रक्कम शासनाने ताब्यात घेऊन गुंतवणूकदारांना व्याजासह परत करावी, कंपनीच्या नावे घेण्यात आलेल्या स्थावर मालमत्तांचा लिलावर करुन मिळणार्‍या रकमेतून गुंतवणूकदारांना रक्कम परत द्यावी, कंपनीच्या नावे असलेली उत्तमी कायापूर येथील प्रकल्पाची जमीन व येणेगूर येथील डेअरीसाठी घेतलेली जमीन शासनाने ताब्यात घेऊन विक्रीतून मिळालेल्या पैशातून गुंतवणूकदारांना रक्कम द्यावी, समृद्ध जीवन ही शासन नोंदणीकृत कंपनी असल्यामुळे या कंपनीच्या व्यवहारातील सर्व जबाबदारी शासनाचीच असल्याने सरकारने याबाबत निर्णय घेऊन गोरगरीब जनतेचे कष्टाचे पैसे परत द्यावेत, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष शाहुराज माने यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात जीवन संघर्ष महिला सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष वर्षाताई काळे, मनसे जिल्हा संघटक अमरराजे कदम, मनविसेचे जिल्हाध्यक्ष नीलेश जाधव, शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष राहूल बचाटे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अजय पवार,यांच्यासह प्रशांत गरड, सुरेंद्र जाधव, विशाल रोडगे, दिलीप गरड, अजय पवार, रणजितसिंह राजपूत, दादासाहेब ढवळे, माधव भोसले, प्रदीप बिराजदार, लक्ष्मीकांत सरसंबे, सोजरबाई घोडके, एम.बी. जामगे, संजय राऊत, श्रीकांत तंमशेट्टे, मीराबाई राऊत, सिद्धाराम पाटील, अंकुश साळुंके, महेंद्रसिंग राजपूत, सरोजा साळुंके, एस.एम. बिराजदार, पद्मीन साळुंके, महादेव भोसले, हरी साळुंके, चंद्रकांत माटे, मनीषा पवार, राम शिंदे, विश्रांत मुसांडे, शरद कवडे, रामचंद्र कडगंचे, कुबेर जाधव, लक्ष्मण मोरे, उत्रेश्वर बेरगळ, हिराबाई पात्रे, यशवंत कांबळे, संगीता सुरवसे, जीनत मातोळे, सुमन चिगुरे, राम घोडके, अंजना घोडके, महानंदा कलकुंटगे, मुक्ताबाई गरड, सुरेखा वाघमारे, बिस्मिल्ला मुल्ला, महिरुम जमादार, महानंदा सुरगुळगे, श्रीदेवी जमादार, वर्षा कांबळे, गोजर बनसोडे जया कांबळे, भाग्यश्री रणदिवे, भ्रष्ट्राचार जनअक्रोशच्या राजकन्या जावळे यांच्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील समृद्ध जीवन कंपनीत गुंतवणूक केलेले ठेवीदार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

0
14635 views