logo

शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वरुडा येथे जागतिक आदिवासी दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वरुडा येथे जागतिक आदिवासी दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा
विकास वाघ कुलकर्णी उस्मानाबाद. दि ९ ऑगस्ट रोजी नुकताच जागतिक आदिवासी दिन व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री शिवकुमार स्वामी( निवासी उपजिल्हाधिकारी उस्मानाबाद) तसेच मा श्री राजकुमार माने (उपजिल्हाधिकारी उस्मानाबाद )मा श्री गणेश माळी (तहसीलदार उस्मानाबाद) मा श्री वसंत पवार माननीय; श्री सुनील काळे( प्रदेशाध्यक्ष आदिवासी पारधी महासंघ) मा श्री भगवान नाईकवाडे( सहाय्यक पोलीस निरीक्षक ग्रामीण उस्मानाबाद )मा श्रीमती शुभांगी कांबळे (सहाय्यक प्रकल्प अधिकारी )श्री रोकडे डी व्ही .(सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण) श्री अनिल चव्हाण (जिल्हाध्यक्ष अ.पा.महा संघ सोलापूर)आदी मान्यवर उपस्थित होते .
मा श्री गणेश माळी यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे सांगून विद्यार्थ्यांमध्ये चेतना निर्माण केली.
आदिवासी पारधी महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष मा श्री सुनील काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आदिवासी समाजासाठीच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी येणाऱ्या समस्या मान्यवरांकडे मांडल्या .अध्यक्ष भाषणामध्ये माननीय श्री शिवकुमार स्वामी साहेब यांनी स्वातंत्र लढ्यामध्ये आदिवासी समाजातील क्रांतिकारकाचे योगदानाला उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविकमध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री कोंढारे बी .बी .यांनी शाळेच्या वाटचाली संदर्भात तसेच अनुसूचित जमातीतील मुलांना शाळेत प्रवेश घेण्याचे आवाहन केले .

जागतिक आदिवासी दिनानिमित्त शाळेमध्येविविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमासाठी वरुडा गावचे सरपंच मा श्री लखन इटकर ,उपसरपंच खंडेराव गाढवे ,मा श्री संजय पवार, नाना दिगंबर पवार ,मा श्री बापू पवार ,माननीय श्री संतोष पवार ,श्री रावसाहेब पवार , श्री नरेंद्र चव्हाण , श्री सिद्धाराम चव्हाण , श्री अविनाश चव्हाण , श्री आप्पा काळे , श्री शंकर पवार, श्री रवी काळे , श्री दत्ता चव्हाण , श्री संजय काळे, श्री सुरेश काळे, श्री जग्गू काळे , श्री दादा काळे , श्री दिलीप काळे , श्री सोपान काळे , सौ आशा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रकल्प अधिकारी श्री. बळवंत गायकवाड साहेब यांचे मार्गदर्शन व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प सोलापूर येथील कर्मचारी वृंद ,आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह उस्मानाबाद चे वार्डन श्री दिवाने सर, तसेच शासकीय माध्यमिक आश्रम शाळा वरुड येथील कर्मचारी वृंद यांचे योगदान लाभले.

0
14651 views