logo

अर्पिता मुखर्जीकडून ईडीने केले 30 कोटी जप्त....................   कोलकाता पश्चिम बंगालमधील ममता सरकारमधील प्रसिद्ध एसए

अर्पिता मुखर्जीकडून ईडीने केले 30 कोटी जप्त....................
 
कोलकाता पश्चिम बंगालमधील ममता सरकारमधील प्रसिद्ध एसएससी शिक्षक भरती घोटाळ्यात मोठ्या भ्रष्टाचाराचे पुरावे सापडत आहेत. या प्रकरणात अटक करण्यात आलेले माजी शिक्षण आणि संसदीय कामकाज मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या आणखी एका फ्लॅटवर छापा टाकून ईडीने 30 कोटींहून अधिक रक्कम जप्त केली आहे.
 
येथे सापडलेली रोख रक्कम ईडीच्या पथकाने ट्रकमध्ये 20 बॉक्समध्ये नेली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिताच्या ठिकाणाहून आतापर्यंत एकूण 53.22 कोटी रुपये रोख मिळाले आहेत.
 
ईडीने बुधवारी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बेलघरिया येथील अर्पिताच्या फ्लॅटवर छापा टाकला होता. याठिकाणी एवढी रोकड सापडली आहे की, मशिन बसवूनही नोटा मोजण्याचे काम सुरू आहे. चॅटर्जीसोबत अर्पिताही ईडीच्या ताब्यात आहे.
कोट्यवधींचे सोनेही जप्त केले
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिताच्या लपून बसलेल्या ठिकाणाहून सुमारे दोन कोटींचे सोनेही जप्त करण्यात आले आहे. 20 पेट्यांमध्ये भरलेली मोठी रोकड सापडली. ते घेण्यासाठी ईडीच्या टीमला ट्रक बोलावावा लागला.
 
अर्पिताची आई मिनाती मुखर्जी म्हणाली की अर्पिताच्या कारनाम्याने मी हैराण आहे. आश्चर्यचकित आहे. मला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नाही.
 
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिताच्या फ्लॅटमधून आतापर्यंत 30 कोटींहून अधिक रोकड मिळाली आहे. नोटा मोजण्यासाठी वेगळ्या प्रकारचे मशीन आणण्यात आले आहे.

31
14646 views