logo

पेटवून घेतलेल्या संत विजयदास यांचे निधन............. बेकायदेशीर खाणकामाला विरोधासाठी आंदोलन जयपूर भरतपूरच्या पासोपा

पेटवून घेतलेल्या संत विजयदास यांचे निधन.............

बेकायदेशीर खाणकामाला विरोधासाठी आंदोलन
जयपूर भरतपूरच्या पासोपा गावात बेकायदेशीर खाणकामाला विरोध करण्यासाठी संत विजय दास यांनी स्वतःला पेटवून घेतले होते. संत विजयदास यांचे शुक्रवारी रात्री दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात निधन झाले. शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
जिल्ह्यातील दीग परिसरात आदिबद्री धाम आणि कनकाचल येथील अवैध उत्खननाविरोधात साधू-संत आंदोलन करत होते. 20 जुलै रोजी मोठ्या संख्येने साधू-संतांनी एकत्र येऊन आंदोलन केले. दरम्यान, संत विजयदास (65 वर्षे) यांनी आंदोलनस्थळीच आत्मदहन केले. पोलिसांनी आणि इतरांनी तात्काळ त्यांना ब्लँकेटमध्ये गुंडाळले पण तोपर्यंत ते 80 टक्के भाजला होते. त्यांना आरबीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले पण त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यावर त्यांना प्रथम जयपूरमधील एसएमएस रुग्णालयात, नंतर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
काय प्रकरण आहे 
भरतपूरच्या आदिबद्री धाम आणि कंकांचल पर्वतीय भागात अवैध खाणकामाच्या निषेधार्थ पळसोपा येथील साधू-संतांसह इतर ग्रामस्थ 551 दिवसांपासून आंदोलन करत होते. संताचा 16 जानेवारी 2021 पासून निषेध सुरू झाला. खाणकामाच्या निषेधार्थ साधू-संतांच्या शिष्टमंडळाने 6 एप्रिल 2021 रोजी जयपूर येथे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेतली.

11 सप्टेंबर 2021 रोजी, मानव मंदिराचे कार्याध्यक्ष राधाकांत शास्त्री यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली. गांधी यांनी शिष्टमंडळाला बेकायदेशीर उत्खननाबाबत सरकारच्या बाजूने आवश्यक ती पावले उचलण्यास सांगितले होते. त्यांनी 100 हून अधिक आमदार आणि मंत्र्यांना 350 हून अधिक निवेदने दिली, परंतु त्यांची सुनावणी झाली नसल्याचे संतांनी सांगितले.

95
14654 views