logo

अनुपम खेर साकारणार जयप्रकाश नारायण यांची भूमिका..................... मुंबई बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या आगामी

अनुपम खेर साकारणार जयप्रकाश नारायण यांची भूमिका.....................

मुंबई बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाद्वारे देशातील सर्वात मोठी राजकीय घटना मोठ्या पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे अभिनेत्री या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असताना दुसरीकडे कंगना या चित्रपटात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसत आहे.
कंगना राणौतच्या लूकनंतर आता या चित्रपटातून बॉलिवूड अभिनेता अनुपम खेरचा लूकही समोर आला आहे. काश्मिरी पंडिताची भूमिका साकारल्यानंतर अनुपम खेर आता या चित्रपटात दिवंगत राजकारणी जयप्रकाश नारायण यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत.
बॉलीवूड अभिनेता अनुपम खेरने त्याचा लूक रिलीज करताना सोशल मीडियावर लिहिले की, ‘कंगना राणौत स्टारर आणि दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात निर्भयपणे प्रश्न करणाऱ्या जय प्रकाश नारायणची भूमिका साकारताना खूप आनंद झाला. मला स्वतःचा अभिमान वाटतो. हा माझा 527 वा चित्रपट आहे! जय हो!’

8
14663 views