logo

लाफ्टर चैलेंज नावाने मित्रांच्या समूहा तर्फे आयोजित विविध सामाजिक उपक्रम जेव्हा ४ मित्र एकत्र येतात तेव्हा आपण मजा

लाफ्टर चैलेंज नावाने मित्रांच्या समूहा तर्फे आयोजित विविध सामाजिक उपक्रम

जेव्हा ४ मित्र एकत्र येतात तेव्हा आपण मजा मस्ती तर नेहमीच करतो पण हेच मित्र आपली सामाजिक बांधिलकी जपून जेव्हा समाजासाठी काही करायचा निर्धार करतात तर ते बरच काही करू शकतात याचे उत्तम उदाहरण लाफ्टर चैलेंज नावाने मित्रांच्या समूहाने दाखवून दिले आहे.

२०१३ साली महावितरण मध्ये सहा. महाव्यवस्थापक पदावर काम करीत असलेले श्री प्रविण रहांगदळे, ओरेकल नावाच्या नामांकित कंपनी मध्ये संचालक म्हणून कार्यरत असलेले धनंजय बेंद्रे व संजय पाथोलोजी चे श्री रजनीकांत देसाई यांनी मिळून लाफ्टर चैलेंज नावाने आपल्या मित्राचा ग्रुप तयार केला होता. त्यात आपल्या ग्रुप तर्फे काही सामाजिक कार्य करून एकत्रित रित्या काहीतरी सामाजिक कार्य करण्याचे आव्हान श्री प्रविण रहांगदळे, धनंजय बेंद्रे व श्री रजनीकांत देसाई यांनी मिळून आपल्या मित्रांना केले व तेव्हा पासुन या समूहाचा सामाजिक कार्य करण्याचा प्रवास सुरु झाला. या ग्रुप तर्फे मागील ७ वर्षा पासुन विवध अत्यंत गरजू सामाजिक संस्थाना विविध साधन सामग्री देऊन मदत केली जाते. आता हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी न चुकता केला जातो. या ग्रुप तर्फे आता हिंदू सेवा सघ मनमोली, समतोल फौंडेशन मनमोली, नवजीवन मुरबाड, मा. सिंदुताईचे ग्लोबल फौंडेशन, महारोगी सेवा समिती अश्या विविध संस्थाना मदत केली आहे.

या सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून ८ एप्रिल व ९ एप्रिल रोजी या ग्रुप तर्फे अभिनव विद्या मंदिर कल्याण येथे गरीब व गरजू विद्यार्थांना खेळ साहित्य, शैक्षणिक सामग्री व वह्या पुस्तके वाटून विद्यार्थांशी संवाद साधून त्यांना उच्च शिक्षण घेण्याकरिता प्रोत्साहन दिले. तसेच हिंदू सेवा संघ व नवजीवन फौंडेशन येथे प्रत्यक्ष जाऊन येथील वसतिगृहात राहणाऱ्या मुलांसाठी अन्न धान्य व किराणा समान देऊन तेथील विद्यार्थांशी संवाद साधला.

मागील २ वर्षात कोव्हीड परिस्थितीत शहरी भागातील संस्थाना काहीना काही मदत मिळाली पण ग्रामीण भागात हि मदत नीट पोहचू शकली नाही. समतोल फौंडेशनचे श्री विजय जाधव यांच्याशी संवाद सडला असता त्याची संस्था रेल्वे स्टेशन वरील अनाथ मुळे जे कोणत्यातरी व्यासांनाच्या आहारी जाऊन गुन्हेगारी जगात प्रवेश करू शकतात अश्या मुलांना व्यसन मुक्त करून त्यांच्या पालकांना परत करतात त्यांच्या संस्थे तर्फे आज पर्यंत शेकडो मुलांना व्यसन मुक्त करून आपल्या पाल्याकडे स्वाधीन करून मूळ प्रवाहात आणले. चर्चे दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार या मुलांमध्ये बरीच मुळे उच्च पदावरील अधिकार्याची व प्रतिष्ठित परिवाराची पण आढळून आली.

107
14680 views