logo

गेवराई मतदार संघातील निराधारांना रयत चा आधार अखेर रयत शेतकरी करणार प्रासत्ताकदिनानिमित्त सामूहिक आत्मदहन! सुनील ठोसर

गेवराई मतदार संघातील निराधारांना रयत चा आधार अखेर रयत शेतकरी करणार प्रासत्ताकदिनानिमित्त सामूहिक आत्मदहन! सुनील ठोसर

गेवराई - मागिल दोन वर्षांपासून गेवराई तालुक्यातील अनेक दिग्गज राजकीय पक्षाचे पुढारी निराधारांच्या प्रश्नावर या ना त्या कारणाने आपल्या राजकारणाची हमखास पोळी भाजू लागले आहेत.माञ अशा राजकीय खेळीमुळे तालुक्यातील हजारो निराधार शासनाच्या अनुदानापासून आजही वंचित राहत आहे.शासनाच्या विविध योजनांपासून वंचीत आसलेल्या निराधारांचे प्रश्न तत्काळ मार्गी लागण्यासाठी,बोगस नावे वगळण्यासाठी,दलालावर गुन्हे दाखल करावेत,प्रशासनाला जागे करण्यासाठी व राजकीय पुढा-यांचा ढोंगीपणा जनतेसमोर आणण्यासाठी आता तालुक्यातील निराधार लोकांसाठी आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घातले असुन गेवराई तालुक्यातील निराधारांचे प्रश्न तत्काळ निकाली न काढल्यास येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करणार आसल्याचे सुनिल ठोसर यांनी निवेदन गेवराई प्रशासनाला दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.
   तालुक्यातील दिग्गज राजकीय पुढारी मागिल दोन तीन वर्षापासून निराधारांच्या प्रलंबीत प्रश्नावर आपली राजकीय खेळी करुन राजकारण करत हमखास पञकबाजी करुन ढोंगीपणा करु लागले आहेत.माञ ख-या निराधारांना या राजकीय लोकांच्या ढोंगीपणामुळे शासनाच्या अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.त्यामुळे अशा राजकीय पुढारी लोकां बद्दल तिव्र संताप व्यक्त करत वंचित आसलेले निराधार अशा पुढा-यांची नावे कानावर येताच नाक मुरडू लागले आहेत.निराधारांचे प्रश्न प्रलंबीत असुन त्यांना न्याय देण्यासाठी जो पुळका ही राजकीय मंडळी दाखवत आहे,त्यांनी ख-या अर्थाने प्रशासकीय पातळीवर जातीने लढा द्यावा अशी मागणी निराधारांमधून होऊ लागली आहे.
       गेवराई तालुक्यातील शासनाच्या विविध योजनेतील अनुदानापासून वंचित आसलेल्या अशा निराधारांना न्याय देण्यासाठी आता रयत शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सुनिल ठोसर यांनी जातीने लक्ष घातल्याचे दिसून येत आहे.बुधवार दि.१२ जानेवारीला तहसील प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमूद केले की,बोगस नावे लावणारे दलाल व तहसील मधील कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे,बोगस निराधारांचे नावे वगळण्यात यावी,यात राजकारण करणा-या कार्यकर्त्याना प्रशासनाने आवर घालावा आदि मागण्या बाबत निवेदन देण्यात आले आहे.दरम्यान २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना पर्यंत प्रश्न मार्गी न लावल्यास आत्मदहन करण्यात येईल असा इशारा सुनिल ठोसर,पांडुरंग कोकरे आदिनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान बीड जिल्हा व तालुका प्रशासन काय भुमिका घेतात याकडे संपूर्ण गेवराई तालुक्याचे आता लक्ष लागले आहे.

7
14683 views
  
14 shares