logo

कोळसा सचिवांनी कोयला दर्पण पोर्टल सुरू केले नवी दिल्‍ली, 21 जानेवारी 2022   कोळसा क्षेत्राशी संबंधित प्र

कोळसा सचिवांनी कोयला दर्पण पोर्टल सुरू केले


नवी दिल्‍ली, 21 जानेवारी 2022

 

कोळसा क्षेत्राशी संबंधित प्रमुख कार्यदर्शक निर्देशांकांची (KPIs) माहिती देण्यासाठी कोळसा मंत्रालयाचे सचिव डॉ. अनिल कुमार जैन यांच्या हस्ते आज "कोयला दर्पण" या पोर्टलची सुरुवात करण्यात आली.

प्रारंभिक पायरी म्हणून, पोर्टलमध्ये पुढील प्रमुख कार्यदर्शक निर्देशांक आहेत - 1. कोळसा/लिग्नाइट उत्पादन, 2. कोळसा/लिग्नाइट उचल  3. उत्खनन आकडेवारी   4. केंद्रीय क्षेत्र योजना, 5. औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये कोळशाच्या साठ्याची स्थिती, 6. पायाभूत सुविधा प्रकल्प, 7. ब्लॉक्सचे वाटप (CMSP/MMDR), 8. प्रमुख कोळसा खाणींवर  देखरेख  (CIL), 9. कोळशाची किंमत.

या कार्यक्रमात कोळसा मंत्रालय आणि सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांचे वरिष्ठ अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  उपस्थित होते. पोर्टल अधिक वापरकर्ता अनुकूल व्हावे, यासाठी अधिकाऱ्यांनी सूचना, मते मांडली.

अधिकाधिक लोकांपर्यंत उपलब्धतेसाठी हे पोर्टल कोळसा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर  (https://coal.gov.in) उपलब्ध आहे.

0
14635 views