logo

एका-४०-वर्षीय तरुणाने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री-११-००-वाजण्याच्या सु



एका-४०-वर्षीय तरुणाने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री-११-००-वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनजवळील गोमंतक बेकरीसमोरील रोहिणी इमारीतीत घडली. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,दशरथ चंद्रकांत पतंगराव-४०   असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.दशरथ हा आईवडील,बहीण आणि भावजय यांच्याबरोबर राहत होता. दशरथ बेरोजगार असून त्याच्या बहिणीचा इमारतीच्या खालीच फुले विकण्याचा व्यवसाय आहे.तिच्या व्यवसायावर घराचा उदरनिर्वाह चालत  असतो.सोमवारी रात्री दशरथने कुटुंबियांसमवेत जेवण झाल्यावर आपली तब्बेत बरी नसल्याचे सांगितले. त्याचे घर इमारतीच्या पाचव्या मजल्यावर टेरेसवर आहे. कुटुंबीय घरी असताना दशरथने इमारतीच्या टेरेसवरील कठड्यावर उभा राहून केबलच्या वायरने गळफास घेण्याचा प्रयत्न केला.मात्र केबलची वायर तुटल्याने इमारतीवरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला.

28
14650 views
  
26 shares