logo

पनवेल - युवक महोत्सव तसेच राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त महाराष्ट्रातील सर्व बंधू व


पनवेल - युवक महोत्सव तसेच राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त महाराष्ट्रातील सर्व बंधू व भगिनींसाठी रत्नकांत म्हात्रे यांनी खास आरोग्यविषयक आरोग्यरत्न व योगरत्न या मार्गदर्शन व माहितीवजा व्याख्यानमाला मराठी व हिंदी आशारत्न व होप्स स्टार या वेब चॅनेलवर सुरू केल्या आहेत. यामुळे याचा लाभ सर्वांना होईल . आरोग्य विषयीच्या सर्व व्याधीनुसार प्रत्येकाला योग्य मार्गदर्शन सल्ला दिला जाईल. 
हा उपक्रम ऑनलाईन तसेच ऑफलाइन असून 2022 साठी वर्षभर सुरू राहील. योग , निसर्गोपचार , माझे सौंदर्य माझ्या हाती, माझे आरोग्य माझ्या हाती, आयुष सुंदर आहे इत्यादी विषयांवर आधारीत व्याख्यानमाला असेल. एक सामाजिक बांधिलकी म्हणुन रत्नकांत म्हात्रे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे तरी सर्व थरातील व्यक्तीनी, महिला मंडळ, सामाजिक संस्था, सरकारी खाजगी कार्यालये, कंपनी यांनी सर्व महाराष्ट्रभर आपापल्या विभागात या व्याख्यानमालेचे आयोजन करावे. आणि याचा लाभ सर्वांना मिळऊन द्यावा. संपर्क 9987886075.

46
16837 views
  
50 shares