logo

*पत्रकार सुभाष पटनाईक यांची " भारतीय पत्रकार महासभा  "  पत्रकारिता संघटनेच्या* *" महाराष्ट्र प

*पत्रकार सुभाष पटनाईक यांची " भारतीय पत्रकार महासभा  "  पत्रकारिता संघटनेच्या*
*" महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष " पदी नियुक्ती 

          *कल्याण-डोंबिवलीचे स्थानिक जेष्ठ पत्रकार सुभाष पटनाईक यांची उत्तर प्रदेश मधील "भारतीय पत्रकार महासभा " संघटनेत "महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष " व " पुणे जिल्हा संपर्क प्रमुख " म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.*

        *भारतीय पत्रकार महासभाचे मुख्य कार्यालय नोएडा,लखनऊ,उत्तरप्रदेश येथे आहे.या संघटनेच्या माध्यमातून उत्तर प्रदेश व महाराष्ट्रातील सर्व स्थानिक व सर्वच भाषिक पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि हितासाठी, न्याय हक्कासाठी कार्यकरणारी एकमेव अशी संघटना म्हणून कार्यरत आहे.*

       *"भारतीय पत्रकार महासभा" चे राष्ट्रीय अध्यक्ष हसनैन जाफरी उर्फ डंपी भैया,उत्तर प्रदेश अध्यक्ष जेगम नगमी,मध्यप्रदेश अध्यक्ष   अरशद अली , मध्यप्रदेशचे राष्ट्रीय सचिव कपिल धाकड,मध्यप्रदेश कार्यकारणी अध्यक्ष मोहम्मद खान या सर्व दिग्गज पदाधिकाऱ्यांनी  "स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनल " चे निर्भीड व झुंजार पत्रकार सुभाष पटनाईक यांची " महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष " व " पुणे जिल्हा संपर्क प्रमुख " म्हणून भारतीय पत्रकार महासभा कमिटीने एकमताने नियुक्ती केली आहे.*

        *जेष्ठ पत्रकार सुभाष पटनाईक यांचे मराठी व हिंदी भाषेच्या लिखाणात विशेष योगदान आहे.सुभाष पटनाईक यांनी पत्रकारितेत २५ वर्ष लिखाणाचे अनुभव मिळविलेले आहे. मराठी साप्ताहिक पंचमुखी मध्ये कल्याण-डोंबिवली प्रतिनिधी म्हणून पत्रकारितेची सुरुवात केली होती.तसेच दैनिक "नवाकाळ" मध्ये सुभाष पटनाईक यांची अनेक कविता प्रसिध्द झाली आहेत.दैनिक लोकमत,दैनिक वार्ताहर या दैनिकात पूर्वी सामाजिक विषयावर पत्रलेखन केले आहे.*

         *दैनिक " कोकण सकाळ " या वर्तमान पत्रात त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली होती.तसेच दैनिक वार्ताहर या वर्तमानपत्रात ललित लेख,सामाजिक लेख,आध्यात्मिक लिखाणाचे पूर्वी कार्य केले आहे. तसेच हिंदी दैनिक " दोपहरका सामना " या वर्तमान पत्रात आठ वर्षे आपल्या लिखाणातून प्रभुत्व गाजविले आहे. संपादक अभिजित राणे यांचे हिंदी-मराठी दैनिक - "मुंबई मित्र" या वर्तमानपत्रात देखील सामाजिक व राजकीय लिखाणाचे विशेष काम केले आहे. उल्हासनगर येथील हिंदी दैनिक " हिंदमाता मिरर " मध्ये चार वर्षे पत्रकारिता केली आहे. साप्ताहिक -"जनालय" या वृत्तपत्रात संपादक आणि प्रकाशक अशी दुहेरी भूमिकेत ५ वर्ष पत्रकारिता करून,सामाजिक,राजकीय आणि आध्यात्मिक लिखाणातून सामान्य जनतेला विविध माध्यमातून जनसेवेच्या माध्यमातून पत्रकारिता केली आहे.*

        *सध्या स्थितीत पुन्हा दैनिक " कोकण सकाळ " मध्ये कल्याण-डोंबिवली विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.तसेच पुण्याचे सुप्रसिद्ध डिजिटल मराठी चॅनल " स्टार महाराष्ट्र न्यूज  " मध्ये गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता करीत आहेत.कल्याण-डोंबिवली शहरातील स्थानिक मराठी वृत्तवाहिणी " जनशक्ती  न्यूज " मध्ये कल्याण-डोंबिवलीचे खास प्रतिनिधी म्हणून पत्रकारिता करीत आहेत.*

7
14654 views
  
11 shares