logo

ठाणे :- ठाण्यातील नौपाडा परिसरात 17 डिसेंबर रोजी 7 ते 8 दुकानांवर दरोडा पडला होता या मुळे परिसरात खळबळ माजली होती, या गु

ठाणे :- ठाण्यातील नौपाडा परिसरात 17 डिसेंबर रोजी 7 ते 8 दुकानांवर दरोडा पडला होता या मुळे परिसरात खळबळ माजली होती, या गुन्ह्यातील आरोपी यांनी दुकानांचे शटर उचकटून आत शिरून चोरी केली होती,

     या गुन्ह्यांच्या तपासाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सोनाली ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, पोलीस निरीक्षक गुन्हे अविनाश सोंडकर, पोलीस निरीक्षक रामचंद्र वळतकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप गोसावी, पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, संगम पाटील, पोलीस हवालदार महेश भोसले, राजेंद्र गायकवाड, साहेबराव पाटील, पोलीस नाईक सचिन रांजणे, सुनील राठोड,संजय चव्हाण, विलास देसाई, पोलीस कॉनस्टेबल गोरखनाथ राठोड, जयेश येळवे, अमित पवार, किशोर काळे, घनश्याम गायकवाड यांनी तपासाला सुरुवात केली प्रथम त्यांनी घटनास्थळीचे व आजूबाजूचे सिसिटीव्ही फुटेज तपासले, त्यानंतर दहा ते पंधरा दिवस सीडीआर व तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून दम डेटा काढून आरोपिंचे लोकेशन शोधून काढले रवी उर्फ गणू तानाजी धनगर वय 19 याला अंबिवली, राज विजय राजापूरे वय 20 वर्ष याला कुर्ला येथून, राजकुमार कमलेश सरोज वय 20 याला उल्हासनगर, बाळकृष्ण उर्फ कृष्णा गोविंद पाल याला अंबरनाथ येथून ताब्यात घेतले, त्यांच्या कडे सखोल चौकशी केली असता त्यांनी नौपाडा परिसरात चार गुन्हे केल्याचे कबूल केले तर पाच गुन्हे बदलापूर, कल्याण, कोनगाव, पेण, चुनाभट्टी येथे केल्याचे कबूल केले, तसेच चोरी करण्यासाठी चोरलेली एक बुलेट व दोन मोटार सायकल ताब्यात घेऊन पाच मोबाईल,2000 रुपये रोख रक्कम व तिन मोटार सायकल असा एकूण 2 लाख 17 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

40
14655 views
  
9 shares