logo

 बातम्या फोटो व्हिडिओ फिचर्स पॉडकास्ट जीवनस्पर्श इंद्रधनुष्य Deshdoot Times ई-प


बातम्या

फोटो

व्हिडिओ

फिचर्स

पॉडकास्ट

जीवनस्पर्श इंद्रधनुष्य

Deshdoot Times

ई-पेपर

शीतलहर कायम; नाशिकसह निफाडमध्ये नीचांकी तपमानाची नोंद....

नाशिकसह जिल्ह्यात वाढलेल्या गारठ्यामुळे आज निफाडमध्ये (Niphad) नीचांकी तपमानाची नोंद करण्यात आली आहे. आज सकाळी नाशिक शहरातीलही तपमान तब्बल सात अंशांनी घसरले आहे. शहरात आज ७.३ अंश सेल्सियस इतके तपमान नोंदविण्यात आले आहे तर निफाडमध्ये सर्वात नीचांकी ६.१ अंश सेल्सियस तपमानाची नोंद कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रावर करण्यात आली आहे...(Mercury dropped in nashik city and district)

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील वातावरणात अमुलाग्र बदल झालेला आहे. शितलहर कायम असल्यामुळे नाशिककर गारठले आहेत. तर कमाल आणि किमान तपमानात कमालीची घट झाल्यामुळे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तपमान ७ अंशांपर्यत खाली आल्यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे.
उत्तर भारतात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तरमहाराष्ट्र गारठला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीने कहर केला आहे. हिमालय व काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे.
त्यामुळे शीतलहर कायम असून तपमानात कमालीची घट झालेली आहे. मकरसंक्रांतिनंतर (Makarsankranti) थंडी कमी होण्याची शक्यता असते, मात्र संक्रांति जवळ आलेली असतानाच तपमानात घट झालेली असल्यामुळे नाशिककर उबदार कपड्यांच्या वापरावर भर देत आहेत, तर अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्यादेखील दिसून येत आहेत.

नाशिकमधील गेल्या पाच दिवसातील तपमान
०६ जानेवारी : किमान १५.४, कमाल २७.७ अंश सेल्सियस
०७ जानेवारी : किमान १५.०, कमाल २९.० अंश सेल्सियस
०८ जानेवारी : किमान १५.६, कमाल २५.१ अंश सेल्सियस
०९ जानेवारी : किमान १४.९, कमाल २४.३ अंश सेल्सियस
१० जानेवारी : किमान ७.३ अंश सेल्सियस...

2
14664 views