logo

वन्दनीय बाळासाहेब ठाकरे मार्ग वापरणाऱ्या वाहन चालकांची लूट......


वंदनीय बाळासाहेब समृद्धी महामार्गाने लोकांचा प्रवास हा जलद आणि वेळेची बचत करणारा ठरला आहे. मात्र ह्या मार्गाने नाशिक पर्यंत प्रवास करणाऱ्या नागरिकांच्यासाठी लुटारू मार्ग ठरला आहे . याचे कारण मुंबईहून नाशिकला जाणाऱ्या वाहनचालकाने समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी येथून बाहेर पडताना तो नियमाप्रमाणे ३६० रुपये टोल भरतो आणि नाशिकच्या दिशेने जाण्यास निघतो तर अवघ्या ३ किलोमीटर अंतर पार केले की त्याला पडघा-इगतपुरी येथे संपणाऱ्या टोल येथून पास व्हावे लागते आणि इथे त्याने केवळ एक दीड किलो मीटर प्रवास पडघा इगतपुरी मार्गावर केला त्याचा भुर्दंड म्हणून १४५ रुपये टोल झटदिशी कापला जातो . टोल नाक्यावर ठेकेदाराचे कर्मचारी असतात. ते सांगतात. आम्हाला टोल न घेण्याच्या कुठल्याही सूचना नाही. आज जाताना आणि पुन्हा येताना सरकारच्या दोन टोल विभागात कुठलाही समन्वय नसल्याने ठेकेदार मात्र बिनधास्त वाहन चालकांचे खिसे कापतो आहे . सरकारने नाशिक येथून समृद्धी महामार्गाला जोडणारा पर्याय दिलेला नसल्याने वाहन चालकांनी जो रोड वापरलाच नाही त्याचे १४५ रुपये नाहक भरावे लागत आहेत.
सरकारने याबाबत तातडीने काही तरी पर्याय काढावा अन्यथा मी सत्ताधारी पक्षात असलो तरी नाशिक टोल च्या इथे आंदोलन करेल. मी आंदोलनाची भाषा यासाठी करतो आहे की, यापूर्वी अनेकांनी तक्रारी केल्या आमचे काही वाकडे नाही झाले, आम्ही टोल घेणार अशी उर्मट भाषा टोल वर असणारे ठेकेदाराचे कर्मचारी करतात. संबंधित विभागाने याची दखल त्वरित घ्यावी अन्यथा सरकारला न कळवता नागरिक म्हणून आम्ही कधीही लोकशाही मार्गाने आंदोलन करू

किरण सोनावणे,
९९२२६६६६०७

49
4374 views