logo

लोकशाहीतला संवाद संपला तर भाषा संपेल :- अरुणभाई गुजराथी: अहिरानी साहित्य परिषद पुरस्कारांचे वितरण

लोकशाहीतला संवाद संपला तर भाषा संपेल :- अरुणभाई गुजराथी:

अहिरानी साहित्य परिषद पुरस्कारांचे वितरण


धुळे प्रतिनिधी: - अहिराणी भाषिकांनी अहिराणी बोलीभाषा मा बोला ना कमीपणा वाटू देऊ नका कारण संवाद संपला तर बोलीभाषा संपून जाईल. जीवनातला संवाद संपला तर संसार संपेल लोकशाहीतला संवाद संपला तर भाषा संपेल, भाषा संपली तर माणूस संपून जाईल. याचं भान ठेवून बोलीभाषा समृद्ध करण्यासाठी अहिराणी भाषेवर प्रेम करा तिच, जतन संवर्धन केलं पाहिजे. तरच भाषा टिकतील अन्यथा नाही. ते धुळे येथील अहिराणी साहित्य परिषद तर्फे आयोजित अहिराणी साहित्य पुरस्कार वितरण सोहळा रविवारी जिल्हा ग्रंथालय सभागृहात प्रसंगी बोलत होते.
श्री. गुजराती म्हणाले,बोलीभाषा टिकली तरच मराठी समृद्ध होईल. बोलीभाषे बरोबर मराठी इंग्रजी भाषेला प्राधान्य द्यावेच लागेल. त्याचबरोबर विज्ञान, तंत्रज्ञान, इंटरनेट हे शब्द अहिराणीत आले पाहिजेत.तरुण पोरसले सांगा अहिराणी बोला असा प्रचार करा ! हे काम अहिराणी परिषदने केले पाहिजे असं मला वाटते.असे आवाहन अहिराणी भाषिकांना केले.साहित्याचा उपयोग समाज प्रबोधन व लोकशाहीचा विचार जिवंत ठेवण्यासाठी झाला पाहिजे. बोलीभाषातल्या साहित्यातूनच हे शक्य होऊ शकते. असे मत त्यांनी व्यक्त केल.
बोली भाषा संस्कृती समाज हे एकमेकांना पूरक असून समृद्ध राष्ट्राचे प्रतीक आहेत. बोली ही तर भाषांना बळ देणारी असल्याने बोलीचे संवर्धन होणे आवश्यक असते. बोली संवादाचे माध्यम नसून दोन व्यक्तींना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. असे प्रतिपादान कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार शरद पाटील यांनी याप्रसंगी केले.
. कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा.शरद पाटील हे होते. कार्यकमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अविनाश जोशी, अध्यक्ष म.वा.मंडळ अमळनेर, संदीप चौधरी अध्यक्ष श्रीजी वाचनालय नंदुरबार, संदीप घोरपडे अध्यक्ष मसाप. शाखा अमळनेर, अँड यतीश गुजराती आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी अहिराणी साहित्य परिषद तर्फे विविध अहिराणी पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात वडांग कादबंरी साठी प्राचार्य डॉ. संजीव गिरासे धुळे यांना कै अँड झेड.बी.पाटील,'भवरा' कथासंग्रह साठी डॉ. ज्ञानेश दुसाने पुणे यांना प.पू.ब.ना कुंभार गुरुजी , प्रभाकर शेळके फागणे यांचा काव्यसंग्रह 'तिनी दुनिया' सौ.प्रभावती भास्कर साळुंखे पुरस्कार, डॉ. सुमती पवार यांच्या काव्यसंग्रह 'हिरिदना बोल' यासाठी कै. सीताबाई शंकर माळी ,ज्ञानेश्वर भामरे वाघाडी तालुका शिरपूर ललित गद्य 'वघाडीना शानाभो'यासाठी कै. पी.जी.पाटील पुरस्कार, प्रा.वा.ना. आंधळे एरंडोल यांच्या अनुवाद लेखनासाठी 'बा तथागता' साठी कै. सुरेश गंगाराम पाटील या आहिरानी साहित्यिकांचा मानपत्र, शाल श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
याप्रसंगी अहिराणी साहित्य क्षेत्रात वर्षभरात विविध मानसन्मान प्राप्त अहिराणी साहित्यिकांचा गौरव करण्यात आला त्यात प्रा.भगवान पाटील, प्रा.रमेश राठोड,प्रा.डॉ. बापूराव देसाई, प्रकाश महाले, प्रा. डॉक्टर फुला बागुल,प्रा. रत्नाताई पाटील आदी साहित्यिकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात प्रा. भगवान पाटील यांनी अहिराणी साहित्य परिषदेच्या कार्याविषयी माहिती दिली. अहिराणी साहित्य परिषद म्हणजे देशातील अहिराणी साहित्यिकांचा मान सन्मान गौरव करण्याचं काम करत असते. तसेच अहिराणी बोलीभाषेतून प्रभावीपणे विचार मांडण्याचा व लोकसाहित्य निर्माण करण्याचे काम परिषद करीत आहे.अहिराणी भाषेला राजभाषे प्रमाणे बोलीभाषेचा उत्तम दर्जा शासनाने दिला पाहिजे.त्याचप्रमाणे बोलीभाषा घराघरात बोलली पाहिजे यासाठी अहिराणी साहित्य परिषद प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी विषद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र वाणी यांनी केले.आभार प्रा.रत्ना पाटील यांनी मानलेत .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी.सी.पाटील, प्रकाश महाले, रत्नाताई पाटील गोकुळ बागुल प्रा.डॉ.फुला बागुल,प्रा. रमेश राठोड, प्रभाकर शेळके, सुमन महाले, भाऊसाहेब सनेर,प्रकाश पाटील आदींनी परिश्रम घेतले.

फोटो कँप्शन
याप्रसंगी माधव फकीरा खलाणेकर लिखित अहिरानी कथा संग्रह ' वायनानी पंगत' व ज्ञानेश्वर घुले (भुसावल ) लिखित काव्यसंग्रह 'अमृताचे निर्झर' या पुस्तकांचे अरुणभाई गुजराती , जेष्ठ साहित्यीक प्रा. वा.ना. आंधळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले

0
0 views