logo

एलसीबीचे ते चौघे निलंबित अखेर मुख्यालयात जमा...



जळगाव : गुरे चोरणारे आरोपी

पोलिसांच्या ताब्यातून पसार झाल्याप्रकरणी निलंबित झालेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या चार पोलिसांना 'लोकमत'मध्ये वृत्त प्रकाशित होताच तातडीने कार्यमुक्त करण्यात आले. १ नोव्हेंबर रोजी ते मुख्यालयात हजर झाले. हवालदार संदीप पाटील, हरिलाल पाटील, प्रवीण मांडोळे व कॉन्स्टेबल राहुल कोळी अशी चौघांची

नावे आहेत.

'लोकमत'ने हा प्रकार उघड केला. त्याची दखल घेत पोलिस अधीक्षकांनी चौघांच्या कार्यमुक्तीचे आदेश दिले.

गुरे चोरीच्या घटनेतील दोन संशयित, शाकीर शहा अरमान शाह (वय ३०) आणि अमजद शेख फकिर कुरेशी (३५) हे अमळनेर येथे आणत, असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या ताब्यातून फरार झाले होते. या निष्काळजीपणामुळे पोलिस अधीक्षकांनी चौघांना निलंबित केले होते. निलंबनांनंतरही या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना स्थानिक गुन्हे शाखेतच ठेवले होते. विशेष म्हणजे त्यांना तपासावर दाखविले होते.

17
888 views