logo

कु. दिवेश देवाडिगा व कु. निशांत चव्हाण यांची रग्बीसाठी आशियाई स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड , ठाणे - ठाणे जिल्ह्यात

कु. दिवेश देवाडिगा व कु. निशांत चव्हाण यांची रग्बीसाठी आशियाई स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड ,

ठाणे - ठाणे जिल्ह्यातील रग्बी खेळाडूंची आशियाई रग्बी स्पर्धे करीता भारतीय संघात निवड दिनांक ५ नोव्हेंबर ते ७नोव्हेंबर २०२२ रोजी २० वर्षा खालील आशियाई कप रग्बी स्पर्धा ताशकंद ,उझबेकिंस्थान येथे आयोजित करण्यात आली आहे. ह्या स्पर्धेकरिता ५ ऑक्टोबर २०२२ पासुन २०वर्षा खालील भारतीय रग्बी संघाचे सराव शिबीर भुवनेश्वर ,ओडिशा येथे सुरू होते .देशभरातून ४० खेळाडूंची या सराव शिबिरामध्ये निवड करण्यात आली होती.ह्या सराव शिबिरातून भारताचा अंतिम संघ निवडण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील रग्बी खेळाडू कु.दिवेश देवडिगा व कु. निशांत चौहान ह्या दोन गुणी खेळाडूंची भारतीय रग्बी संघात करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा रग्बी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. निलेश भगत साहेब, उपाध्यक्ष मनोहर गुंडरे सर, सचिव प्रमोद पारसी(प्रशिक्षक), खजिनदार श्री. यदनेश्वर बागराव व सर्व सदस्यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्र रग्बी असोसिएशनचे सचिव नासेर हुसेन ,सह सचिव संदीप मोसमकर ,खजिनदार मिनल पास्ताला ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लागले.

57
14674 views
  
1 shares