logo

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन की बात संबोधन व पंडित दीनदयाळ उपाध्याय, स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिव


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मन की बात संबोधन व पंडित दीनदयाळ उपाध्याय, स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून केलेले संबोधन अर्थात मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने किनारा हॉटेल येथे करण्यात आले,

तसेच आज पंडित दीनदयाळ उपाध्याय व स्व.अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला जिल्हा कार्यालय प्रतिष्ठान भवन येथे पुजन केले .

यावेळी कार्यकर्त्यांनी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संवादातून मार्गदर्शक सूचना घेतल्या,या वेळी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात सुरू असलेली अनेक विशेष सेवाकार्याची माहिती दिली तसेच योग व्यायाम, सामाजिक स्वच्छता मोहीम, टाकाऊ वस्तूमधून सुंदर वस्तूंची निर्मिती, स्थानिक पातळीवर कलाकारांनी तयार केलेल्या वस्तुंना प्राधान्य, खादी ग्रामोद्योग निर्मित वस्तूंचा वापर, प्लास्टिक बॅग या ऐवजी कापडी पिशवीचा वापर याबाबत बोध घेतला.

यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, सोशल मिडिया महाराष्ट्र प्रदेश कंटेंट टीमचे प्रमुख पांडुरंग(अण्णा)पवार, भाजप जिल्हाउपाध्यक्ष इंद्रजित देवकते, सह संयोजक सलमान शेख, राज निकम, सचिन लोंढे, बापू पवार, अमोल राजेनिंबाळकर, श्रीराम मुंबरे, गणेश एडके, सुनील पंगुडवाले, रोहीत देशमुख, स्वप्नील नाईकवाडी, प्रसाद मुंडे, चंदन जाधव, ओमकार देवकते शुभम बनसोडे, यांची उपस्थिती होती.

0
16395 views