logo

प्रभाग क्रमांक अ मध्ये दीड दिवसांचा गणरायाचे विसर्जन , १६ ठिकाण्यांवर ९६८ गणेश मूर्तीचे विसर्जन , कल्याण - कल्या

प्रभाग क्रमांक अ मध्ये दीड दिवसांचा गणरायाचे विसर्जन ,

१६ ठिकाण्यांवर ९६८ गणेश मूर्तीचे विसर्जन ,

कल्याण - कल्याण डोंबिवली महानगरपालिका - घनकचरा व्यवस्थापन विभाग , गणेशोत्सव निमित्त स्वच्छता अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक अ क्षेत्रामध्ये दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करण्यात आले. प्रभाग क्रमांक अ मध्ये एकूण 16 ठिकाण्यांवर ९६८ बाप्पांची मूर्तींची विसर्जन करण्यात आली. माननीय आयुक्त श्री दांडगे , माननीय उपायुक्त श्री धैर्यशील जाधव परिमंडल १ , माननीय उपायुक्त घनकचरा व्यवस्थापक श्री अतुल पाटील , माननीय सहायक आयुक्त अ प्रभाग क्षेत्र श्री सुहास गुप्ते , स्वच्छता अधिकारी श्री मोहनीश गडे यांच्या मार्गदर्शनाखालील सदरची गणेशोत्सव निमित्त स्वच्छता अभियान व श्री गणेश मूर्ती विसर्जन व्यवस्था करण्यात आली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका तर्फे स्वयंसेवकांना नाश्ता व चहा उपलब्ध करून दिले. श्री अक्षय कराळे , श्री सलीम शेख , श्री रोशन गुंजाळ , श्री भरत पाटील , श्री अमोल पवार , श्री अनंता पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते.

51
14682 views