logo

*तानाजीराव सावंत यांच्या मंत्रिमंडळातील शपथविधीचा शिंदे गट शिवसैनिकांनी केला जल्लोष* "धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महा

*तानाजीराव सावंत यांच्या मंत्रिमंडळातील शपथविधीचा शिंदे गट शिवसैनिकांनी केला जल्लोष*

"धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवा नेते सूरज महाराज साळूके यांच्या नेृत्वाखाली मिठाई वाटून फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली".


धाराशिव -विकास वाघ कुलकर्णी.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या भाजपा-शिवसेना (शिंदे गट) सरकारमध्ये परंडा-भूम-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.तानाजीराव सावंत यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल धाराशिव येथे
मा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे गटातील शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे युवा सेनेचे राज्य विस्तारक तथा मा. नगराध्यक्ष सुरज साळुंके यांच्या नेतृत्वाखाली मिठाई वाटून फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली.

महाराष्ट्रात झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांचा मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. यामध्ये परंडा-भूम-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली युवा शिवसैनिक मोठ्या संख्येने शिंदे गटात सहभागी झालेले आहेत. आज (दि.९) रोजी जाहीर झालेल्या मंत्रिमंडळात प्रा.तानाजीराव सावंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रा.तानाजीराव सावंत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याचे वृत्त धाराशिव शहरात धडकताच शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे युवक नेते अजित लाकाळ, नामदेव निकम, श्रीनिवास लाकाळ, नाना सूर्यवंशी, मधुकर झाल्टे, रामा घोगरे, प्रणिल रणखांब, ज्ञानेश्वर ठवरे, राहुल मोरे, आकाश माळी, महेश मगर, रणजित चौधरी, अविनाश टापरे, गगन आगलावे, सुरज राऊत, गणेश जाधव, योगेश तुपे, महेश महानवर, राकेश ठवरे, अविनाश कदम, महेश देवकते, ओंकार मैराण, बबलू वंडरे, अक्षय देवकते, सचिन मडके, दिनेश तुपे, बबलू नवले, अजय भगत, महादेव आगलावे, संतोष देवकर यांच्यासह युवा शिव सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0
14656 views