logo

ईडीने जप्त केलेले पैसे जातात कुठे .............? मुंबई मागील काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात ईडीकडून कारवाया हो

ईडीने जप्त केलेले पैसे जातात कुठे .............?

मुंबई मागील काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात ईडीकडून कारवाया होताना दिसत आहेत. या कारवायांमध्ये कोट्यवधींची रोख रक्कम, दागिने, जमीन, बंगले अशी मालमत्ता जप्त होत आहे. पण या मालमत्तांचे पुढे काय होते. एवढा पैसे जातो कुठे हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो.

महाराष्ट्रातील संजय राऊत प्रकरण आणि पश्चिम बंगालचे पार्थ चॅटर्जी प्रकरण सध्या देशात मोठ्या प्रमाणात गाजत आहे. पार्थ चॅटर्जीची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी हिच्या घरातून 50 कोटींहून अधिक रोख आणि सोने जप्त केले गेले. तर राऊत यांच्यावर पत्राचाळ प्रकरणी 1 हजार कोटींचा कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. एवढ्या मोठ्या रकमांचे पुढे काय होते. ईडीच्या जप्तीच्या कारवाईनंतर पुढे काय होते?
 
चांदी आणि इतर गोष्टी सापडतात. गेल्या 4 वर्षांमध्ये 67,000 कोटी जप्त केले.
 
तपास यंत्रणांनी जप्त केलेले पैसे केंद्र सरकारच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जमा केले जातात. काही प्रकरणांमध्ये, तपास यंत्रणा पैसे स्वतःकडे ठेवतात आणि खटला पूर्ण होईपर्यंत हे पैसे तपास यंत्रणांकडे राहतात. जर जप्त केलेल्या पैशांमधील एखाद्या नोटांवर काही निशाणी असेल  किंवा काही लिहिलेले  असेल तर ते पंचनाम्यात नमूद केले  जाते.  अशा नोटा  तपास यंत्रणा पुरावा म्हणून ठेवून घेतात आणि पुरावा म्हणून न्यायालयात सादर केल्या जातात.
 
उर्वरित रोकड बँकेत जमा केली जाते. पंचनाम्यामध्ये किती रक्कम वसूल झाली, किती गड्ड्या आहेत, कोणत्या करेंसीचे किती नोट आहे, म्हणजेच 200 च्या किती, 500 च्या किती नोट आहेत याची माहिती दिली जाते. सरकारी एजन्सी छापे टाकतात  तेव्हा त्यांना  कागदपत्र, रोख रक्कम, सोने, रुपयांची मालमत्ता जप्त केली. छाप्यात जप्त केलेल्या मालाचा अधिकारी पंचनामा करतात. यावेळी ज्यांचा माल जप्त केला जातो त्यांची सही देखील पंचनाम्यात असते.
 
त्यानंतर जी मालमत्ता जप्त केली जाते त्याला ‘केस प्रॉपर्टी’ म्हणतात.जर कारवाईदरम्यान  स्थावर मालमत्ता जप्त केली गेली  असेल तर  PMLA कलम 5 (1) अंतर्गत प्रॉपर्टी अटॅच केली जाते. मालमत्तेची जप्ती न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर, पीएमएलए कलम 9 अंतर्गत सरकार या मालमत्तेचा ताबा घेते.  या संपत्तीची खरेदी, विक्री किंवा याचा वापर केला जाऊ शकत नाही.

165
14654 views