logo

11 वर्षीय मुलीवर नऊ जणांचा सामूहिक बलात्कार.................. नागपूरच्या उमरेडमधील घटना नागपूर उमरेड शहरात 11 वर्षीय

11 वर्षीय मुलीवर नऊ जणांचा सामूहिक बलात्कार..................

नागपूरच्या उमरेडमधील घटना
नागपूर उमरेड शहरात 11 वर्षीय मुलीवर नऊ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या सर्वांना अटक करण्यात आली आहे. पीडितेचे आई-वडील मजूर असून मुख्य आरोपी अल्पवयीन मुलीच्या घराजवळ राहतो.
एका खुनाच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही घटना उघडकीस आली. नागपूर ग्रामीण एसडीओपी पूजा गायकवाड यांनी ही माहिती दिली. पीडितेवर महिनाभरात अनेकवेळा सामूहिक बलात्कार झाला. उमरेड नागपूर शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. ही घटना 19 जून ते 15 जुलै दरम्यान घडली.
नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम दामडू हत्याकांडातील मुख्य आरोपी रोशन कारगावकर हाही या प्रकरणात मुख्य आरोपी आहे. चार दिवसांपूर्वी नागपूरच्या उमरेडमध्ये शुभम भोजराज दामडू या तरुणाची दोघांनी हत्या केली होती. या प्रकरणी रोशनसह दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीदरम्यान, 11 वर्षीय मुलीवर आरोपी रोशन आणि त्याच्या आठ साथीदारांनी सामूहिक बलात्कार केला होता ही माहिती समजली.
पीडित मुलगी आठवीत शिकते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आठवीच्या वर्गात शिकते. आरोपी रोशनने तिला फूस लावून आपल्या घरी नेले होते. तेथे रोशन आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर त्याला 300 रुपये दिले आणि हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
रोशन करगावकर (29) आणि त्याचे मित्र- गजानन मुरस्कर (40), प्रेमदास गाठबांधे (38), राकेश महाकाळकर (24), गोविंदा नाटे (23), सौरभ उर्फ ​​करण रिठे (22), नितेश फुकट (22) अशी आरोपींची नावे आहेत. प्रद्युम्न करूटकर (22) आणि निखिल उर्फ ​​पिंकू नरुळे (24) यांचाही समावेश आहे.

79
16513 views
  
1 shares