logo

गुजरातमध्ये विषारी दारू पिऊन मृत पावलेल्यांची संख्या   आतापर्यंत 28....................... गुजरातच्या बोताड मध्ये वि

गुजरातमध्ये विषारी दारू पिऊन मृत पावलेल्यांची संख्या   आतापर्यंत 28.......................

गुजरातच्या बोताड मध्ये विषारी दारू पिऊन जीव गमवणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत 28 लोकांचा मृत्यू झाला आहे, हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.
गुजरातचे डीजीपी आशिष भाटिया यांनी 28 जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. ते म्हणाले, 600 लिटर बनावट दारू 40 हजार रुपयांना विकली जात होती.
गुजरात मध्ये पूर्णपणे दारूबंदी करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 10 जणांना ताब्यात घेतले आहे. हे लोक केवळ विषारी दारू विकत असल्याचे समजते.
या घटनेनंतर गुजरातचे  गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी, मृतांपैकी एकाच्या पत्नीने सांगितले होते की, रविवारी रात्री बनावट दारू प्यायल्यानंतरच पतीची तब्येत बिघडली होती.  बोटाड जिल्ह्यातील रोजिंद, अनियाणी, आकरू, चांदेरवा, उंचाडी या गावातील लोक बनावट दारू पिऊन आजारी पडल्याच्या बातम्या आहेत. सर्वच गावात गोंधळाचे वातावरण आहे.
दरम्यान आप ने या प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला आहे. “दारूबंदी असलेल्या  गुजरातमध्ये 15 वर्षात बनावट दारू पिऊन 845 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये दारूबंदीनंतरही मोठ्या प्रमाणात अवैध दारू विकली जाते, हे दुर्दैवी आहे. दारू विकणारे हे कोण आहेत? त्यांना राजकीय आश्रय मिळतो. दारू विक्रीतून आलेला  पैसा जातो कुठे? याचा तपास व्हावा” अशी मागणी ‘आप’ चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

34
14648 views