logo

मासिक पाळी सुरु असल्यामुळे शिक्षकाने विद्यार्थनीला वृक्षारोपणापासून रोखले ............... नाशिक येथील कार्यक्रमातील घ

मासिक पाळी सुरु असल्यामुळे शिक्षकाने विद्यार्थनीला वृक्षारोपणापासून रोखले ...............

नाशिक येथील कार्यक्रमातील घटना

21 व्या शतकातील भारत पुढारलेला आणि सुशिक्षित आहे अशा कितीही मोठमोठ्या गप्पा आपण मारत असलो तरी खरी परिस्थिती तशी नाही याची अनेक उदाहरणे आपण रोजच्या आयुष्यात पाहत असतो. अशीच एक घटना नाशिक येथे उघड झाली आहे. विद्यार्थिनीला मासिक पाळी सुरु असल्यामुळे तिच्या शाळेतील एका शिक्षकाने तिला वृक्षारोपण करण्यापासून रोखले आहे. या घटनेची माहिती उघड होताच सगळीकडे खळबळ उडाली आहे. मागील आठवड्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव येथील  शासकीय कन्या आश्रम शाळेत राष्ट्रीय वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला होता.
या शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थिनी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पण या विद्यार्थिनींपैकी एका विद्यार्थिनीला शिक्षकांनी वृक्षारोपण करण्यापासून रोखले.  कारण  संबंधित  मुलीला मासिक पाळी आली होती. “तू झाड लावू नकोस, कारण झाड जगणार नाही.”  असे  सांगत शिक्षकाने त्या मुलीला झाड लावू दिले नाही.
संबंधित शिक्षकावर आता कारवाईची मागणी होत आहे.

36
14645 views