logo

आरे कॉलनीमध्ये मुंबई मेट्रोच्या कामावरील बंदी मुख्यमंत्र्यांनी उठवली .................... आरे कॉलनीमध्ये मुंबई मेट्र

आरे कॉलनीमध्ये मुंबई मेट्रोच्या कामावरील बंदी मुख्यमंत्र्यांनी उठवली ....................

आरे कॉलनीमध्ये मुंबई मेट्रोची कारशेड  उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरेमधील कामावरील बंदी उठवली आहे.  उद्धव ठाकरे यांनी  मुख्यमंत्री असताना  पर्यावरणाला हानी पोहोचत असल्याचं कारण सांगत बंदी घातली होती. ही बंदी उठल्यामुळे आता आडीच वर्षांनी कारशेडचे  काम पुन्हा सुरू होणार आहे.
ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर मेट्रो कारशेडचे  काम थांबवण्यात आले होते.  उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रोची कारशेड कांजुरमार्गला हलवण्याची प्रक्रिया सुरु केली होती.  पण आता पुन्हा राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला आहे. त्यामुळे आरेतच मेट्रो कारशेडच काम सुरु करण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला आहे.

75
14666 views