logo

युवक युवतींचा नागरी संरक्षण दल मध्ये प्रवेश , ठाणे - महाराष्ट्र शासन,गृह विभाग, नागरी संरक्षण, नवी मुंबई समुह ठाणे,

युवक युवतींचा नागरी संरक्षण दल मध्ये प्रवेश ,

ठाणे - महाराष्ट्र शासन,गृह विभाग, नागरी संरक्षण, नवी मुंबई समुह ठाणे, अंतर्गत व मार्गदर्शनाखाली विद्या प्रसारक मंडळचे बा.ना. बांदोडकर स्वायत्त विज्ञान महाविद्यालय ठाणे, (प.) येथे सकाळी १०.३० ते दु. १५:०० या वेळेत ५ दिवसीय युवक युवतींना नवीन नोंदणी धारकांसाठी नागरी संरक्षण मूलभूत पाठ्यक्रम क्र. १८/२०२२ चे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षणास एकूण १०२ NCC, NSS सह महाविद्यालयीन प्रशिक्षणार्थी हजर होते. आज प्रशिक्षणाच्या अंतिम दिवशी नियोजित वेळापत्रकाप्रमाणे व्याख्यान व प्रात्यक्षिकाचे सादरीकरण सहाय्यक उपनियंञक श्री.बाबुराव तामनेकर यांनी स्वयंसेवक श्री.अजित कारभारी (राज्य युवा पुरस्कार -महाराष्ट्र शासन) यांचे सहाय्याने सर्वांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेतली. सांगता समारोहाच्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री. संजय केळकर (आमदार तथा माजी मुख्य क्षेत्ररक्षक नागरी संरक्षण दल ठाणे) हे व बा. ना. बांदोडकर महाविद्यालयाचे प्राचार्य, कॅप्टन डॉक्टर मोजेस कॉलेट सर, विद्या प्रसारक मंडळातील डॉक्टर. सुधाकर आगरकर व उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल, नवीमुंबई समुह ठाणे श्री.विजय जाधव, राष्ट्रीय छात्र सेनाचे अधिकारी कॅप्टन बिपीन धुमाळ सर, शिक्षीका देवयानी लाडे मॅडम हे उपस्थित होते. मा.संजयजी केळकर साहेबांनी त्यांचे ३ तप आमदारकीचे व माजी मुख्य क्षेञरक्षक, नवीमुंबई समुह, ठाणे म्हणुन केलेल्या कार्याचे स्वानुभव अनेक उदाहरणांसह मार्गदर्शन केले तर श्री.विजय जाधव, उनिनासं, नवीमुंबई समुह, ठाणे यांनी उपस्थितांना मौलिक व उद्बोधक मार्गदर्शन करुन सामाजिक बांधिलकीची शपथ दिली.
नागरी संरक्षण प्रशिक्षण महाविद्यालय, मुंबई. येथून निदेशक पाठ्यक्रम क्रमांक १ मध्ये सहभागी सर्व विशेष क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजना करिता स्वयंसेवक श्री.अजित कारभारी यांची विशेष मोलाची साथ लाभली.

63
16092 views