logo
(Trust Registration No. 393)
अपने विचार लिखें....

युवा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण ,

अंबरनाथ - नागरी संरक्षण दल, नवी मुंबई समुह, ठाणे अंतर्गत ९ मे ते १३ में २०२२ रोजी अंबरनाथ कार्यालय, ठाणे स.१०.००वा. ते २.०० वा पर्यंत
नेहरू युवा केंद्र ठाणे (भारत सरकार) शी संलग्न युवा मंडळाच्या १०० युवक युवतींना प्राथमिक आपत्ती व्यवस्थापन मुलभूत पाठ्यक्रम आयोजित केला गेला.
सदर प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. विजय जाधव‌ साहेब (उपनियंञक, नागरी संरक्षण नवीमुंबई समुह, ठाणे) , मा.श्री. सुनिल गमरे
(नेहरू युवा केंद्र ठाणे, भारत सरकार प्रतीनिधी) ,
मा. अतुल जगताप (सहाय्यक उपनियंत्रक, नासंद) , श्री. अजित ब. कारभारी (राज्य युवा पुरस्कारार्थी- महाराष्ट्र शासन व नासंद स्वयंसेवक)
उपस्थित होते.
आपत्तीजनक काळात युवक युवतींनी समाजकल्याणासाठी जिवीत व वित्त हानी बचावात्मक कार्यासाठी प्रथम प्रतिसाद द्यावा या उद्देशाने प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले.
मा. उपनियंञक यांनी बहुमोल मार्गदर्शन करुन येणाऱ्या पावसाळ्यात ठाणे जिल्ह्यांतर्गत येणार्‍या६ महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागास भरघोष सहाय्य करण्यांस, ४ क्षेञांतर्गत १९ विभागांमधुन ४० स्वयंसेवकांची एक याप्रमाणे ४ QRT (Quick Response Team) तयार करुन येणार्‍या आपत्ती व अडचणींवर मात करण्यासाठी सज्ज राहण्यांस व योग्य तो प्रतिसाद देणेबाबत बहुमोल व उद्बोधक मार्गदर्शन केले.

45
13748 views