logo

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रग्बी स्पर्धा संपन्न, भारतातील विविध विद्यापीठातील ५०० पेक्षा जास्त खेळाडूंचे सहभाग क

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रग्बी स्पर्धा संपन्न,

भारतातील विविध विद्यापीठातील ५०० पेक्षा जास्त खेळाडूंचे सहभाग

कल्याण : मुंबई विद्यापीठ आणि बी. के. बिरला महाविद्यालय कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय अंतर विद्यापीठ रग्बी स्पर्धा १२ अप्रैल ते २१ अप्रैल दरम्यान शहाड येथील रामलीला मैदानमधे आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत भारतातील विविध राज्यातील विविध विद्यापीठातील एक हजाराहून अधिक पुरुष व महिला खेळाडू सहभागी झाले होते. खेळाचे उद्घाटन कल्याण डोंबिवलीचे आयुक्त विजय सूर्यवंशी , प्रा. आर. डी. कुलकर्णी, प्रा. उपकुलगुरु, मुंबई विद्यापीठ, मुंबई आणि डॉ. नरेश चंद्र, शिक्षण संचालक, बी. के. बिर्ला महाविद्यालय, कल्याण आणि राहुल बोस, अध्यक्ष, रग्बी फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया, यांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेतील महिला गटात १५ खेळाडूंचा साईड मध्ये मुंबई विद्यापीठ प्रथम , लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब दुसरी तर महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाने तिसरी क्रमांक पटकावला , ७ खेळाडूंचा साईड मध्ये लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी प्रथम , पाटलीपुत्र युनिव्हर्सिटी दुसरी , शिवाजी युनिव्हर्सिटी तिसरी तर पुरुष गटात १५ खेळाडूंचा साईड मध्ये चंदिगढ युनिव्हर्सिटी प्रथम , मुंबई युनिव्हर्सिटी दुसरी , शिवाजी युनिव्हर्सिटी तिसरी तर ७ खेळाडूंचा साईड मध्ये लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी प्रथम , कलिकट युनिव्हर्सिटी दुसरी क्रमांक पटकावला.बी. के . बिर्ला नाईट कॉलेजचे प्राचार्य आणि आयोजक डॉ. हरीश दुबे , ठाणे जिल्हा रग्बी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. निलेशजी भगत , सचिव श्री प्रमोद पारसी सर , खजिनदार श्री यदनेश्वर बागराव सर , सेंचुरी शाळेचे क्रीडाशिक्षक श्री सुभाष कोंढारी सर आणि राष्ट्रीय रग्बी संघाचे इतर मान्यवर, अनेक विद्यापीठे आणि महाविद्यालयांचे क्रीडा संचालक आणि प्राध्यापकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

47
14720 views
  
1 shares