logo

अंबरनाथ व उल्हासनगर मधिल महावितरणाच्या समस्या प्राधान्याने सोडवणार ऊर्जा मंत्री ना.नितीन राऊत यांचे आमदार डॉ. ब



अंबरनाथ व उल्हासनगर मधिल महावितरणाच्या समस्या प्राधान्याने सोडवणार
ऊर्जा मंत्री ना.नितीन राऊत यांचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना ग्वाही

अंबरनाथ व उल्हासनगर मधील महावितरणच्या वाढत्या समस्या मार्गी लागण्याच्या दृष्टीने पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने आमदार डॉ.बालाजी किणीकर महावितरण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते.याची दखल घेत बुधवारी ऊर्जा मंत्री ना.नितीन राऊत यांच्या मंत्रालयीन दालनात महावितरणच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. याबैठकीच्या सुरवातीला वाढत्या शहरीकरणा याभागात महावितरणाची व्यवस्था ही सक्षम करण्याच्या सूचना ऊर्जा मंत्री ना.राऊत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
 याबैठकी दरम्यान 
गायकवाड पाडा येथे सबस्टेशन उभारण्याकरिता महावितरणकडे जमीन हस्तांतरित करण्यात आले असून याठिकाणी सब स्टेशन उभारण्याचे काम जलदगतीने मार्गी लावण्यात यावे.
उल्हासनगर ४ येथे सब स्टेशन स्टेशन उभारण्यात यावेत.
- मोरिवली येथे असलेले सबस्टेशनची क्षमता वाढविण्यात यावी.
-  विमको नाका येथील एक आणि दोन सप्लाय टॉवर नादुरुस्त झाले असून ते तातडीने बदलण्यात यावे.
 - उल्हासनगर ४ व ५ मधील ऊर्जा नियोजनासाठी स्वर्गदार, उल्हासनगर - ५-येथे नवीन-२२-२२ केव्ही चे स्विचिंग स्टेशन उभारण्यात यावे.
- नियोजित नवीन पाले अंबरनाथ औद्योगिक वसाहतीच्या ऊर्जाभार नियोजनासाठी नवीन २२०-२२ केव्ही अति उच्च दाब उपकेंद्र उभारण्यात यावे.
- अंबरनाथ पूर्व व पश्चिम भाग तसेच उल्हासनगर ४ व ५ क्षेत्रातील सर्व उपरी वाहिन्या भूमिगत करण्यात यावे.
- महावितरण विभागाच्या IPDS व RPDRP योजनेअंतर्गत विविध कामे मंजूर करण्यात आली होती. परंतु सदर कामे प्रलंबित असल्याने सदर कामांची चौकशी करण्यात यावी तसेच संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना ऊर्जा मंत्री महोदयांनी दिल्या.
- अंबरनाथ व उल्हासनगर मधील जुने व जीर्ण झालेले लाईटचे पोल तात्काळ बदलाच्या सूचना ही यावेळी ऊर्जा मंत्री यांनी दिल्या तसेच याप्रसंगी महावितरणच्या संदर्भातील अन्य विषयांवर चर्चा करण्यात आली.
याबैठकिला माजी नगराध्यक्ष श्री.सुनिल चौधरी, माजी उपनगराध्यक्ष अब्दुल भाई शेख, नगरसेवक धनंजय बोडारे, माजी नगरसेवक श्री.सुभाष साळुंखे, सिंधी सेनेचे श्री रवि खिलनानी, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री.दिनेश वाघमारे, प्रकल्प संचालक श्री. भालचंद्र खंडाईत, श्री. अरविंद भालेकर,अधीक्षक अभियंता श्री.भावले, कार्यकारी अभियंता श्री.प्रवीण चावले तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

45
14660 views
  
17 shares